निशंक होई रे मना तारक मंत्र Swami Samarth Tarak Mantra Lyrics

Swami Samarth Tarak Mantra Lyrics

गुरु ब्रम्हा गुरु विष्णु, गुरु देवो महेश्वरा.
गुरु साक्षात परब्रम्हा, तस्मै श्री गुरवे नमः

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।
अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।

जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,
स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।
आज्ञेवीना काळ ही ना नेई त्याला,
परलोकी ही ना भीती तयाला
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।

उगाची भितोसी भय हे पळु दे,
वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे ।
जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,
नको घाबरू तू असे बाळ त्यांचा
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।

खरा होई जागा श्रद्धेसहित,
कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।
आठव! कितीदा दिली त्यांनीच साथ,
नको डगमगु स्वामी देतील हात
अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।

विभूति नमननाम ध्यानार्दी तीर्थ,
स्वामीच या पंचामृतात।
हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,
ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।

श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ।।~।।

श्री स्वामी समर्थ महाराज की जय ।।
श्री दत्तगुरु महाराज की जय ।।

भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे.
🌼🌺 श्री स्वामी समर्थ 🌼🌺

अशक्य ही शक्य करतील स्वामी !

🙏 Bhakti Ocean को सहयोग करें

यदि यह भक्ति लेख / कथा / स्तोत्र आपको अच्छा लगा हो, तो कृपया Bhakti Ocean YouTube Channel को सब्सक्राइब कर हमारे सेवा-कार्य को सहयोग दें।

🌸 सब्सक्राइब करके धर्म का प्रचार करें

Scroll to Top